Vastu door Directions & Effects

दक्षिण मध्य दरवाजा

South center main door

दक्षिण मध्य दरवाजा ह्या दिशेचा दरवाजा सुरवातीला भरपूर पैसा देऊ शकतो कारण ही अदिलक्ष्मीची दिशा आहे. या घरातल्या लोकांकडून खर्च खु होऊ शकतात,त्यांना वेगवेगळ्या सवयी व व्यसने लागू शकतात. या घरात राहणा ऱ्यांच्या येणाऱ्या पाहुण्यांकडून कोणत्याही अपेक्षा नसतात,त्यामुळे पाहुण्यांचे आदरातिथ्य खूप चांगल्या प्रकारे होते . गरजवंतांना शक्य असल्यास या घरातून मदत मिळू शकते. दक्षिण दिशेला सूर्य किरणे जास्त काळ असल्याने ही दिशा तप्त असते. त्यामुळे असे दरवाजे ज्या घरात असतात ,त्या लोकांच्या मनात भौतीक आणि शारीरिक सुख मिळवण्याची भावना असू शकते. जे पैसे कमावले जातात त्यांचा अपव्यय या घरात होऊ शकतो . हि दिशा ऋण (कर्ज ) ची दिशा आहे .ह्या घरातले लोक कर्जाखाली दबलेले असू शकतात.कारण त्यांना कर्ज सहज उपलब्ध होते . अशा घरात राहणाऱ्यांची संख्या हळूहळू कमी होऊ शकते. घरात सतत भांडणे होऊ शकतात.

दक्षिण नैऋत्य दरवाजा

या घरातील माणसे जेवढे कष्ट करतात . त्याप्रमाणे त्यांना यश मिळत नाही . मूत्राशयाचे विकार होऊ शकतात . घर मालकावर जीव घेणं हल्ला होऊ शकतो . कोर्ट कचेऱ्या होऊ शकतात . भांडणे , मारामारी होऊ शकते . अचानक एकादी दुर्घटना होऊन शकते , मृत्यू होऊ शकतो .वाईट स्वप्न पडू शकतात , घरात त्रास होऊ शकतो . पैश्याच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते . नोकऱ्या टिकू शकत नाही . शेजाऱ्यांशी भांडणे होऊ शकतात.

South west main door

पश्चिम नैऋत्य दरवाजा

West south main door

या घरातील माणसे नेहमी कोर्ट कचेऱ्या व पोलीस स्टेशन मध्ये गुंतलेली असू शकतात . या घरात चोरी होण्याची शक्यता असते . आर्थिक कटकटी असू शकतात .घर मालकाचे त्याचा पत्नी बरोबर नेहमी वादविवाद होणे ,त्याचे घरात काहीच चालत नाही .लग्नामध्ये त्याचे जवळच्या नातेवाईकांकडून फसवणूक होऊ शकतात .मानसिक छळ होणे . पुढाऱ्याची पदे यांना मिळतात. या घरातील लोक व्यवहारी असतात म्हणून यशस्वी होतात.आजूबाजूच्या परिसरात त्यांची सत्ता असते.ते सर्वांच ऐकतात पण निर्णय स्वतः घेतात .ते दूरदर्शी व दृढनिश्चयी असतात.

पश्चिम मध्य दरवाजा

अशा घरांमध्ये स्त्रियांची सत्ता जास्त असू शकते. पुरुषांचं वर्चस्व कमी होऊ शकतात,त्यांचं घरात चालेनास होऊ शकत. या घरातील पुरुष नेहमी कामानिमित्त घराबाहेर राहू शकतात सर्व कामांना या घरामध्ये विलंब होऊ शकतात .स्त्रिया चंचल असू शकतात. अशा घरातील नोकर मालकाच्या प्रामाणिक पणाचा गैर-फायदा घेऊ शकतात. अशा घरांमध्ये दीर्घ काळ टिकणारे आजार होऊ शकतात. या घरच्या पश्चिमेला विहीर,तलाव असल्यास या घरातील दुष्परिणाम जास्त भयानक असू शकतात. शांती नसते, एक संकट संपले कि दुसरे संकट तयार होणे असे प्रकार घडू शकतात.
ही शनी ग्रहाची दिशा आहे. त्यामुळे कुठल्याही कामात विलंब होणे ते काम न होणे असे प्रकार होऊ शकतात. या घरात राहणारे लोक त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात प्रसिद्ध असतात. ते पैशासाठी हपापलेले असू शकतात. त्यांचे एकमेव उद्दिष्ट असते. कोणत्याही प्रकारे सत्ता कमवावी .आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला असतो. स्वतःच्या गरज त्यांना चटकन समजतात. ते कष्टाळू असू शकतात. त्यांची वर्तणूक स्वार्थी असू शकतात. त्यांचे विचार आणि निर्णय ते त्यांच्या फायद्या नुसार बदलतात ते सहज काळा पैसा कमावू शकतात.

West center main door

पश्चिम वायव्य दरवाजा

West North main door

या घरात स्त्रियांची सत्ता अधिक वाढू शकते , आणि पुरुषांचा वर्चस्व कमी होऊ शकतो . घरातील पुरुष कामानिमित्त सतत बाहेर राहू शकतात . आर्थिक दृष्ट्या हा दरवाजा फायदेकारक आहे .मालक वेगवेगळे व्यवसाय करून पैसे कमवू शकतो . त्यांनी मालमत्ते मध्ये गुंतवणूक केल्यास, त्यांना जास्त फायदा होऊ शकतो . ह्या घरातील लोक चाणाक्ष बुद्धीचे असू शकतात त्यांना त्यांच्या कुटुंबाबद्धल प्रेम आणि आपुलकी असू शकते . या घरातील मुलांना अजीर्णाचे आजार असू शकतात . ते संशयी वृत्तीचे असू शकतात. कोणावरही सहज विश्वास ठेवत नाहीत . त्यांना झोपेचे आजार व पाठीचे दुखणे असू शकते . कोणताही निर्णय सहज घेऊ शकत नाही .

उत्तर वायव्य दरवाजा

या दिशेचे अधिपत्य चंद्राकडे आहे . या घरातील लोक एकमेकांमध्ये कमी मिसळतात . या घरातील लोक चुका मान्य करत नाही दुसऱ्यांवर आरोप करतात . घरातील मालकाची बदली घरापासून लांब होऊ शकते . या घरामध्ये नेहमी वादविवाद होतात व कोणीही स्वतःची चूक मान्य करीत नाही . मानसिक समाधान नसते .

North west main door

उत्तर मध्य दरवाजा

north center main door

ही दिशा कुबेराची दिशा आहे बुद्धीची दिशा आहे .हे लोक स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखून असतात. कुठे काय बोलावे कसे बोलावे हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते.प्रत:काळाची सूर्यकिरणे त्यांच्या अंगावर पडल्याने ते धैर्यवान असू शकतात. वाईट परिस्थितीत पण ते चांगल्या प्रकारे निर्णय घेऊ शकतात.ते प्रेमात सहज पणे पडत नाही आणि पडल्यास ते परिस्थितीचा पूर्ण विचार करून पडतात. जर उत्तर वायव्येत स्वयंपाक घर असेल तर बऱ्याचदा समस्या किंवा मानसिक समस्या असू शकतात. जर त्या घरातील मालक शासकीय नोकरीत असेल तर तो उच्च पदावर पोहचू शकतो, गैर मार्गाने त्यांच्याकडे बराच पैसे येवू शकतो .तो गुंतवणूक चांगल्या प्रकारे करू शकतो .दुसऱ्यांना कळू न देता करू शकतो.

पूर्व आग्नेय दरवाजा

सर्व नैसर्गिक तत्वे या दिशेतून अस्तित्वात येतात . हि दिशा बिघडल्यास घराच्या संपूर्ण उर्जेमध्ये असंतुलन येऊन घराचे संतुलन बिघडते .
हि दिशा शुक्र ग्रहाची दिशा आहे . धनधान्य आणि लक्ष्मीची दिशा आहे . हि दिशा बिघडल्यास शुक्र ग्रहाची शक्ती नष्ट होते . आणि त्यांचे नकारात्मक गुणधर्म या वास्तूत पसरतात . या घरातील तरुण मुले- मुली भौतिक सुखामागे लागून बिघडू शकतात . कुठलेही कष्ट न करता सहज पैसा मिळवण्याच्या नादी लागू शकतात . घरामध्ये शांती राहत नाही . एकोपा बिघडू शकतात तरुण पिढी वाईट मार्गाला लागू शकते . नेहमीच घरामध्ये भांडणतंटे आणि झगडे असू शकते . घरमालकाला दारूचे व्यसन लागून तो त्यात सर्व काही गमावून बसू शकतो . या घरातील लोक पैसा आणि प्रसिद्धी मिळवू शकत नाहीत . स्त्रिया नेहमी आजारी असू शकतात आणि या घरातील माणसे मानसिकरित्या दुखी असू शकतात . उजवा गुडघा आणि उजवे कोपर यांचे दुखणे होऊ शकते .आणि अपघात पण होऊ शकतो. हि दिशा उर्वरित दिशांपेक्षा उंच असल्यास अशा घरांमध्ये त्यातील लोकांचे आयुष्मान सरासरी कमी असू शकते . जर घरांच्या पूर्व आग्नेय कोपऱ्यात विहीर असेल तर ते कुटुंब मानसिक व शारीरिक त्रास भोगण्याची शक्यता असते . हि दिशा उर्वरित दिशांपेक्षा कमी उंचीची असल्यास त्या घरात चोरी होण्याच्या किंवा आग लागण्याच्या घटना घडू शकतात .

East south main door

दक्षिण आग्नेय दरवाजा

South east main door

वास्तूशास्त्राच्या मते, हा सर्वात जास्त पैसे देणारा फायदेशीर दरवाजा आहे . पहिले ८ वर्षात घरमालकाला खूप पैसे देऊ शकतो , ज्याने तोच गर्भ श्रीमंत होऊ शकतो . ८ वर्षानंतर पुढील ४ वर्ष मालकाला गरिबी कडे नेऊ शकतो . त्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते . हि दिशा मैत्रीची दिशा म्हणून ओळखली जाते . ह्या दरवाज्यात कोणताही वास्तुदोष नसेल तर तुम्हाला चांगले मित्र भेटू शकतात . आणि खूप पैसे कमावू शकतात . अशा घरात पाहुण्यांचे स्वागत चांगले केले जाते हा दरवाजा स्त्रियांसाठी शुभ असतो . त्या खूप शिकतात व उच्च पदाला जाऊ शकतात . मात्र पुरुषांची प्रगती होऊ शकत नाही . घरामध्ये पैसा येतो पण छानछौकी वर उडवला जाऊ शकतो . झटपट पैसा मिळवण्याच्या नादात गुन्हेगारी कामाकडे वळू शकतात . जी लक्षणे पूर्व आग्नेय दिशेच्या दरवाज्याला आहेत तीच लक्षणे या दरवाजाला देखील लागू शकतात .

Leave a Comment