मुख्य दरवाजा

घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच घराचे मुख. आता बऱ्याच लोकांना असे वाटते कि दरवाजा म्हणजेच वास्तुशास्त्र तर असे नाही आहे. वास्तुशास्त्रात असे अनेक घटक आहेत कि या सगळ्या घटकांचं मिळून एक शास्त्र निर्माण झाले. त्यातील एक घटक म्हणजेच दरवाजा .साध्या भाषेत समजवायचे झाले तर ,समजा आपले संपूर्ण शरीर म्हणजे वास्तू आहे, त्या शरीरावर असलेले मुख म्हणजेच दरवाजा. आता माझे मुख चांगले आहे,परंतु दुसऱ्या शरीराच्या भागांमध्ये व्यंग आहेत किंवा आजार आहेत तर मला सुख लाभेल का? किंवा बरे वाटेल का?
दुसऱ्या दृष्टिकोनातून बघूया कि माझा शरीराचे सगळे भाग चांगले आहेत,परंतु मुख्य दरवाजा किंवा मुख यात समस्या आहेत. जसे माझा मुखामध्ये दातच नाहीयेत,माझे मुख पूर्ण उघडत नाहीये, ते वाकडेच आहे किंवा मुखामध्ये एखादा आजार झालाय,तर माझ शरीर संतुलित राहील का ? अर्थातच नाही,कारण माझा शरीराला लागणारे पंचतत्त्व म्हणजेच अन्न हे मुखाद्वारे शरीरात जाणार पण जर तिथेच अडथळे असतील या पंचतत्त्वांची ऊर्जा माझा शरीराला लागणारच नाही आणि अनेक प्रकारचे त्रास माझा शरीरात चालू होऊ शकतात.

घराचा आकार चौकोन किंवा आयतच का असावा ?

 जर तुम्ही वास्तू पुरुष नीट न्याहाळून पाहिलात तर तुम्हाला असे दिसून येईल कि,हा जो चौकोन दाखवलाय तो चौकोन म्हणजे वास्तू आणि त्यात झोपवलेला वास्तूपुरुष म्हणजे मानवी शरीर हे दोघे हि समान त्यांचे गुणधर्म समान आहेत ते एकाच पंचतत्वांनी बनलेल्या आहेत. मग यांचे गुणधर्म समानच असणार ना ? मग अशा स्थितीत मुख्य दरवाजा कोणत्या दिशेत आणि त्या दिशेच्या कोणत्या चरणात येतोय ते महत्वाचे आहे. मिळणारे फलित हे त्या दिशेवर त्या चरणावर अवलंबित आहेत. हा विचार फक्त मुख्य दरवाजांपुरता सीमित आहे, परंतु बऱ्याच लोकांना भ्रम झाला आहे, मग ते घरातील अंतर्गत दरवाजाचा पण त्याच दृष्टिकोनातून विचार करतात तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो कि हे गुणधर्म अंतर्गत दरवाजांना लागू पडत नाही कारण ते घरच्या अंतर्गत भागात आहेत.त्यांचे काम मुख्य दरवाजाकडून आलेल्या ऊर्जेचा अंतर्गत भागात प्रसार करणे एवढेच आहे .

     मुख्य दरवाजाचे काम काय ? तर या निसर्गातील पंचतत्त्वांची ऊर्जा घरामध्ये आणणे. मग हे कार्य करत असताना कुठेही बाधा येऊ नये यासाठी वास्तुशास्त्रात सांगितले आहे कि हा मुख्य दरवाजा योग्य दिशेत,योग्य चरणात असावा तो इतर दरवाजा पेक्षा भव्य असावा,स्वछ असावा,सुंदर असावा,दरवाजाच्या चौकटीत लाकडाचा उंबरठा असावा, दरवाजा बंद करताना किंवा उघडताना कोणतेही कर्कश आवाज येऊ नयेत ,दरवाजा उघडताना किंवा बंद करताना तो कुठेही अडकू नये,बाधा येऊ नये.दरवाजाला कोणत्याही प्रकारची तडा,वाळवी लागलेली असू नये अशा अनेक बाबी लिहिल्या गेल्या आहेत. पुढील लेखामध्ये विविध दिशेतील ,विविध चरणातील दरवाजांचे गुणधर्मांचे अनुमान सांगितलेले आहेत.
          आता मुख्य दरवाजा योग्य दिशेत योग्य चरणात आहे परंतु ती वास्तू चौकोनात किवां आयाताकृतीत नाही ,तिचे काही भाग कापले गेलेले आहेत,काही भाग वाढलेले आहेत चुकीच्या चरणात स्वयंपाक घर आलेले आहे,अंतर्गत शिडी, बाथरूम, शौचालय ,पिलर आलेला आहे.तर मग मुख्य दरवाजा जरी चांगला असेल तरी त्या वास्तूमध्ये दोष तयार होऊन तेथील व्यक्तींना त्रास होऊ शकतात हे त्रास आर्थिक,मानसिक,शारीरिक आणि वैवाहिक प्रकारचे पण होऊ शकतात. म्हणूनच वास्तूच्या विविध पैलूं वर लक्ष द्यावे लागते.मुख्य दरवाजा म्हणजेच वास्तूशास्त्र नाही.

एका रांगेत तीन दरवाजे असणे अशुभ कि शुभ ? असे का म्हटले जाते ?

बऱ्याच लोकांना गैरसमज आहे कि ३ दरवाजे एका सरळ रेषेत असतील तर ते अशुभ असतात? तर याच अर्थ काय ते पहिले आपण समजून घेऊया.जेव्हा आपण एका सरळ रेषेत ३ दरवाजे म्हणतो तेव्हा मुख्य दरवाजा, घरातील आतील दरवाजा, आणि घरच्या मागच्या दिशेतील दरवाजा यांचा विचार करण्यात आलेला आहे. मग कुठलाही एक मुख्य दरवाजा घेऊया.उदा उत्तर मध्याचा मुख्य दरवाजा घेतला तर त्याचा विरुद्ध दिशेत दक्षिण मध्याचा दरवाजा येणार याचा अर्थ या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना उत्तर मध्याचा दरवाजाचे चांगले गुणधर्म पण भेटणार आणि दक्षिण मध्य दरवाजाचे दूषित गुणधर्म पण भेटू शकतात .

Leave a Comment