Watch About Vastu Shastra

In this video you can get Basic information about vastu shastra

Directions & Effects

Happy Families From Maharashtra

Dr.Uday Avatade
5/5
Rutuja Sutar
5/5
Dinesh Gawade
5/5
Avinash Balkawade
5/5

Featured TV Channels :

Info about Directions - English

Info about Directions - Marathi

ईशान्य दिशेत दोष असेल आणि त्याचा बाजूला असलेल्या उत्तर मध्याला दोष असेल तर त्याचे परिणाम काय असू शकतात. आता दोष म्हणजे काय तुम्हाला समजवून सांगतो समजा या दिशे मध्ये बिल्डिंग चा जाड पिलर ,टॉयलेट,बाथरूम, किचन असेल किंवा हा भाग कट असेल म्हणजेच हा भाग आपल्या घर मध्ये नाहीये तर याचे परिणाम तुम्ही प्रोग्रॅम मध्ये बघितले असतील कि  इथे पैसा टिकेनासा होऊ शकतो ,कर्ज वाढू शकत ,धंदा चालेनासा होऊ शकतो ,आर्थिक फटके बसू शकतात ,किंवा चामडीचे रोग होऊ शकतात,डोळयांचे ,हृदयाचे त्रास होऊ शकतात ,जन्मजात मुलांमध्ये व्यंग,आजारपण येऊ शकतात . आता ईशान्य कोपरा तुम्हाला समजला असेल , आता उत्तर मध्य दिशेला दोष असतील तर त्याचे काय परिणाम असू शकतात. इथं पैसा टिकेनासा होऊ शकतो ,पैसा  आजारपणात जाऊ शकतो.मग असं पण होऊ शकत एखाद बाळ  जन्मलंय आणि त्याला जन्मजात काही त्रास आहेत आणि त्याचा मागे हा सगळा पैसा आजार पणामध्ये  जाऊ शकतो अगदी लहानपणापासूनच. अस ही होऊ शकत एखाद्याने बिझनेस चालू केलय आणि बिझनेस नंतर अचानक आजारपण येतंय मालकाला आणि अचानक सगळं पैसा हृदयाचा शस्त्रक्रिये मागे जाऊ शकतो किंवा अपघातात डोळ्यांना इजा होउ शकते ,तर असा हा पैसा वाया जाऊ शकतो किंवा पैसा येण  बंद होऊ शकत .कारण उत्तर दिशा दूषित झाली किंवा तिथे दोष तयार झालेत. तर या दोन दिशांच्या कॉम्बिनेशन मुळे हे त्रास आपल्या घरत होऊ शकतात.

उत्तर मध्य ला दोष असतील तर पैसा आजारपणात जाऊ शकतो,पैसा टिकेनासा होऊ शकतो,पैसे यायचा बंद होऊ शकतो,डोक्याच्या व्याधी,पॅरालिसिस सारखे प्रकार ,अपघातामध्ये डोक्याला मार लागणं असे काही प्रकार होऊ शकतात,आता वायव्य कोपरा म्हणजे काय हा कोपरा आहे मनस्थितीचा त्याच प्रभुत्व चंद्राकडे असत,आता चंद्र बिघडला म्हणजे वायव्य कोपरा बिघडला तर काय होऊ शकत? घरात मानसिक अस्तिरता वाढू शकते,एकमेकांशी पटेनास होऊ शकत ,पाठीच्या कण्याचे त्रास ,झोप न लागण ,ऍसिडिटी होणं ,हे सगळे त्रास इथून चालू होऊ शकतात. तर इथे असही होऊ शकत घरात सतत एक माणूस आजारी असतो आणि त्यात त्याची मनस्थिती बिघडते आणि त्याला मानसिक त्रास चालू होऊ शकतात.आणि या मानसिक त्रास मुळे आत्महत्येसारखे प्रकार घडू शकतात,किंवा छोट्याशा कारणावरून मोठे वाद-विवाद होऊ शकतात.तर या दोन दिशांच्या कॉम्बिनेशन मुळे हे त्रास आपल्या घरत होऊ शकतात.

समजा आपल्या घरात पश्चिम मध्य ला स्वयंपाकघर असेल तर त्याचे परिणाम काय होतात. इथे निरंतर झोपून ठेवणारे आजार होऊ शकतात किंवा स्त्रियांना थायरॉईड ,घशाचे त्रास ,हळू हळू माणसांची संख्या कमी होणं,दूरवर बदल्या होणं,तोंडाशी आलेलं घास जाणं,वेळेवर काम न होणं,सारखे यंत्रांमध्ये बिघाड होणं,हे परिणाम होऊ शकतात.आता वायव्य आणि पश्चिम दिशेला दोष आहे तर त्याचे परिणाम असेही होऊ शकतात. एकदा एका घरात पश्चिमेच्या मध्यावर दोष  होता आणि त्या स्त्रीला थायरॉईडचा त्रास होता.त्या त्रासामुळे ती स्त्री घरत जोरजोरात बोलायची कारण तिला माहित नव्हते कि असा काही त्रास आहे पण तिच्या कुटुंबियांना असे वाटायचे कि हि ओरडून आमच्यावर बोलते तिची घरात सारखी चिडचिड चालू राहायची आणि मग नाते संबंध खराब झाले तर या दोन दिशांच्या कॉम्बिनेशन मुळे हे त्रास आपल्या घरत होऊ शकतात.

नैऋत्य कोपरा म्हणजे घरमालकाचा. इथे जर काही वास्तुदोष झाला तर सर्व प्रथम जो परिणाम होतो तो घरमालकावर होऊ शकतो . घर मालकाला अकाली अपघाती निधन होणं ,घातकी हल्ला होणं ,कमरेखालचे त्रास ,पायाचे त्रास ,किडनी लिव्हरचे त्रास ,आर्थिक फसवणूक होणं ,नाहक पोलीस स्टेशन / कोर्ट-कचेरीशी संबंध येणं,नको त्या प्रकरणात नाव गोवल जाणं, नाते संबंध खराब होणं तर काही घरामध्ये स्वप्न पडणं,भीती वाटणं ,भास होणं ,चोऱ्या होणं  हे परिणाम होऊ शकतात .

उदा . १- एका घरामध्ये घर मालकाची दूरवर बदली झाली आणि त्यानंतर त्या कंपनी मध्ये अचानक चोरी झाली त्यामध्ये नाहक त्याला गुंतवला गेल,आणि अचानक त्याची नोकरी गेली.

२. एका घर मालकाला अपघात झाला आणि त्याला निरंतर बेड वर झोपून त्याला आजारपण काढावं लागलं असे परिणाम या दोन दिशा दूषित झाल्यामुळे दिसू शकतात .

 

जर दक्षिण मध्य भाग कट झाला असेल किंवा वाढला असेल किंवा स्वयंपाकघर ,दरवाजा असेल तर हे परिणाम होऊ शकतात. घरात वारंवार छोटेमोठे शस्त्रक्रिया होणं,कर्ज वाढणं, छोटीमोठी भांडण ,स्त्रियांची  सतत चिडचिड होणं असे प्रकार होऊ शकतात

उदा. १- नैऋत्य कोपऱ्यात जर बाथरूम किंवा कट असेल आणि दक्षिण मध्य ला स्वयंपाकघर आहे तर त्या घरमालकाला अपघात झाला आणि त्याचा गुढघ्याला  मार लागला आता या माणसावर एक नाही,दोन नाही तर तब्बल अकरा शस्त्रक्रिया करण्यात आल्या तरी त्याचे निदान झाले नव्हते.

२- एका घरमालकाच् अचानक निधन झालं आणि त्यानंतर या कुटुंबाची आवक पूर्ण बंद झाली होती. परंतु खर्च तेवढेच होते त्यामुळे त्यांना घर विकण्याची वेळ आली. तर या दोन दिशांच्या कॉम्बिनेशन मुळे हे त्रास आपल्या घरत होऊ शकतात.

अग्नेय कोपऱ्यात दोष असेल म्हणजेच बाथरूम, शौचालय, दरवाजा,शिडी ,पिलर ,कट,वाढलेला भाग असेल तर हा दोष तयार झाला. आग्नेय कोपरा म्हणजे स्त्रियांचा इथे स्त्रियांना त्रास होऊ शकतो. स्त्रियांना आजारपण ,शारीरिक सौख्य न मिळणं ,लग्न न जमणं ,लग्न न टिकणं, व्यसन वाढणं , मुल न होणं ,स्त्रियांना कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात ,मासिक पाळी, गर्भाशयाचे त्रास होऊ शकतात. 

पूर्व मध्य दिशेला दोष असेल  म्हणजेच बाथरूम, शौचालय,स्वयंपाकघ,शिडी,पिलर ,कट,वाढलेला भाग असेल तर हा दोष तयार झाला.त्यामुळे घरात नाहक बदनामी होणे ,रक्तदाब ,मधुमेह, हात पाय दुखण ,गुडघेदुखी ,संधिवात हे त्रास होऊ शकतात .

ब्रम्हस्थान म्हणजे घराचा मध्य. इथे चुकूनही स्वयंपाकघर ,शौचालय,बाथरूम,पिलर ,कट ,खड्डा ,भिंत नसावी. इथे जर दोष असेल तर पोटाचे विकार ,अन्नपचनाचे त्रास ,आर्थिक वाढ न होणं, जीवास धोका तयार होऊ शकतो,परिस्थिती सुधरत नाही असे त्रास होऊ शकतात.