“वास्तूशास्त्र” म्हणजे काय ?

“वास्तूशास्त्र”

            “वास्तूशास्त्र” या शब्दतातच स्प्ष्ट होतंय कि वास्तूचे शास्त्र म्हणजेच वास्तुशास्त्र.शास्त्र म्हणजे विज्ञान,अगदी  बरोबर हे आपल्या पूर्वजांनी भौगोलिक परिस्थितीचा हवामानाचा ,हवामानात होणाऱ्या बदलांचा ,प्रत्येक ऋतूतील तापमानाचा, त्या परिस्थिती राहणाऱ्या मानवी शरीराचा शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास करून जे शास्त्र लिहिले तेच वास्तूशास्त्र.मग हे शास्त्र लिहिण्याची गरज का निर्माण झाली असेल ? सर्व प्रथम मानवाची जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा मानव देखील सर्व सामान्य प्राण्यांना प्रमाणे झाडावर ,जंगलात राहत होते .हळूहळू आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर निसर्गाला अनुसरून कसा राहता येईल याचा सखोल अभ्यास करू लागला.आता पहा पूर्वी मानव झाडाची पानांचं वापर वस्त्र म्हणून करत होती ,मग त्या नंतर अनेक पदार्थांचा वापर वस्त्र म्हणून करण्यात आले . सरतेशेवटी त्याला कापसाचा शोध लागला मग त्यांनी रेशमी वस्त्र बनवले.                                                  हाच प्रकार आहार शास्त्रात पण झाला ,पूर्वी मानव कंदमूळ खाऊन जगत होता,प्राण्यांची शिकार करून भाजून खात होता ,त्यानंतर त्याला अनेक मसालेदार पदार्थांचा शोध लावला मग ज्या वस्तू फक्त भाजून खात होते तेच पदार्थ शिजवून,तळून आणि वाफवून खाऊ लागला.याचेच रूपांतर नंतर पाककला शास्त्रात झाले .असे अनेक शास्त्र मानवाने स्वतःच्या उत्क्रांतीसाठी ,काळानुसार सोयीसाठी आणि शरीराला अपाय न करणारी अशी शास्त्र लिहिली गेली. कोणतेही शास्त्र लिहिताना मानवाने ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा ,हवामानाचा ,हवामानात होणाऱ्या बदलांचा ,प्रत्येक ऋतूतील तापमानाचा ,त्या परिस्थिती राहणाऱ्या मानवी शरीराचा तसेच जी गोष्ट वापरतोय तिचा उपलब्ध होण्याच्या क्षमतेचा विचार करूनच शास्त्राची निर्मिती झाली.                            आपली पृथ्वी हि पंचतत्वांनी (पंचमहाभूत) बनली आहे. मग हि पंचतत्व कोणती ? जल ,वायू ,अग्नी ,अवकाश आणि जमीन या पंचतत्वांनी सृष्टीची निर्मिती झाली.याच तत्वांचा समावेश आपल्या शरीरातही  आहे.आपल्याला शाळेत शिकवले कि नाही कि आपले शरीर ,अन्न हे याच पाच तत्वांनी बनलेले आहे .मग याच पाच तत्वांचा वापर करून मानवाने आपल्या वास्तूची (घराची ) निर्मिती केली. म्हणूनच पूर्वीच्या घरांमध्ये जल ,वायू,अग्नी,अवकाश आणि जमीन यांचाच वापर केला जायचा म्हणूनच पूर्वीच्या बांधकामामध्ये आपल्याला लाकूड ,माती ,दगड ,वायूचा समतोल पणा,अग्नीची योग्य दिशा ,जलसाठयाची योग्य दिशा या सर्व गोष्टींचा वापर योग्य रित्या आणि योग्य दिशेस केला जायचा . हे साहित्य आपल्याला सहज उपलब्ध होत होते,या साहित्या मध्ये त्याच पाच तत्वांचा समावेश आहे जे आपल्या शरीरामध्ये आहेत . मग अशा साहित्य पासून बांधलेले घर आपल्याला अपायकारक ठरेल कि फायद्याचं ठरेल ?                                     आता आपण वातावरण आणि ऋतुमानाचा विचार करू ? आपल्या महाराष्ट्रातच विविध भागात विविध भौगोलिक परिस्थिती पाहायला मिळते . उदा. आपण जर कोकण पट्ट्यात गेलो तर तिथे पावसाचे प्रमाण अधिक आहे ,उष्णता जास्त डोंगराळ भाग असल्यामुळे कमी जाणवते ,पाण्याचा सतत निचरा असल्यामुळे थंडी देखील खूप असते मग अशा परिस्थितीला कशा प्रकारची घर बांधायला पाहिजेत याचा विचार करून उतरत्या कौलारू छपरांची, बसकी, मातीने लिपलेली, किंवा चिऱ्या ,जांभ्या दगडांनी ,शेणाने सारवलेल्या जमिनीची घरे बांधली जात. कि ज्यामुळे या तीनही ऋतूंना त्या ऋतूतील तापमानाला तेथील पाहणारी माणसे सहज तोंड देत ,त्या परिस्थितीला सामोरे जात आणि आपले आयुष्य सुखकारक बनवत असत .                                                 हाच अभ्यास आपण जर घाटावर केला उदा .कराड ,सातारा, कोल्हापूर,सांगली, सोलापूर, अहमदनगर तर इथे ऋतुमानामध्ये बदल होतो जसे पावसाचे प्रमाण कमी होते सपाट भूमी आणि झाडांच्या कमतरतेमुळे उन्हाची दाहकता वाढते व थंडी हि बोचरी असते.मग अशा परिस्थितीचा अभ्यास करून त्या भागांमध्ये काळ्या दगडांचा वापर घर बांधण्यासाठी केला जात असे .पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे घरची छते हि उतरती कौलारू नसतात.तर हि काळी दगडे घरच्या आतील परिसर थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड ठेवण्याचे काम करतात म्हणून त्या परिस्थितीचा अनुसरून याच पाच तत्वांचा वापर करून इथली घरे बांधली जातात.                या सर्व गोष्टीतून आपल्याला एकच कळले कि मानवाने कोणत्याही शास्त्राचा शोध लावताना मानवी शरीराला खूप महत्व दिले कारण जर शरीर जर व्यवस्थित नसेल तर त्याचा साहजिकच परिणाम मनावर होतो मन दुखी राहत या दोनी गोष्टी व्यवस्थित नसतील तर सहाजिकच याचा परिणाम आर्थिक सुबकतेवर होतो . म्हणूनच शारीरिक ,मानसिक आणि आर्थिक सुख प्रत्येक कुटुंबाला,प्रत्येक माणसाला कसे प्राप्त होईल याकडे जास्त ध्यान देण्यात आलेले आहे.                                   1. या वास्तूंची निर्मिती करताना दोन-तीन गोष्टी ध्यानात  घेण्यासारख्या आहेत.पूर्वी शौचालाय आणि स्नानगृह घराच्या आतील भागात बांधली जात नव्हती मग असे का ? घर तर आकाराने मोठी होती ,ऐसपैस जागा होती तरीही त्या दोन गोष्टींना घरच्या आतील भागात स्थान देण्यात आले नव्हते याला काहीतरी शास्त्रीय कारण असणार ना ? बहुतेक वाहत्या पाण्याचा ,सांडपाण्याचा निचरा याचा संबंध मुख्य वास्तूशी येऊ नये व तेथील ऊर्जेचा समतोलपणा  बिघडू नये यासाठीच या दोन गोष्टीतुन राहत्या वास्तूपासून दूर ठेवण्यात आले असा माझा वैयक्तिक मत आहे.                 2.  दुसरी गोष्ट पूर्वीची घर बांधताना त्यांच्या भिंतींमध्ये पिलर्सचा वापर केला जात नव्हता. एकतर जाड दगडांची भिंत बांधली जायची किंवा माती ,विटांची सरळ भिंत बांधली जात होती,आता या पिलर्स टेकनॉलॉजिचा वापर आपले पूर्वज हि करू शकले असते पण त्यांनी ते कटाक्षाने टाळले कारण या पिलर्समुळे घराच्या आतमध्ये येणाऱ्या पंचतत्वांच्या उर्जेला बाधा किंवा विरोध होऊन घरातील ऊर्जा असमतोलपणा वाढत असेल. आताच्या बांधकामामधे मग ती घर बैठी असोत किंवा इमारतीमधील असोत प्रत्येक घरामधे पिलर्सचा वापर दिसतो.जुन्या काळातही उंच इमारती बांधल्या गेल्या,वाडे बांधले गेले परंतु यामध्ये पिलर्सचा वापर कुठेही दिसून येत नाही.

3.तिसरी गोष्ट जुन्या बांधकामामध्ये जर आपण पाहिलं तर आपली घरे चौकोनात किंवा आयताकृती आकारात होती. कुठेही ओबडधोबड वाढलेले भाग किंवा कापलेले भाग आढळत नसत तेच जर आपण सध्याचा बांधकामात पाहिल तर घरचे आकार चौकोनी किंवा आयातकृतीत कुठेही दिसत नाहीत.घराला डिझाईन किंवा वेगळे पणा दिसावा म्हणून  काही भाग वाढवलेले तर काही भाग कापलेले आपल्याला दिसून येतात अशी पद्धती परदेशात वापरली जाते ती त्यांच्या भौगोलिक परिस्थिती,हवामान,तापमान आणि ऋतुमानानुसार त्यांना योग्य आहे.हीच पद्धती आपल्याला घातक  होत चालली आहे,घरामध्ये अनेक प्रकारचे वास्तुदोष तयार झालेले दिसतात आणि त्याचा परिणाम मानवी जीवनावर घातकरित्या झालेला दिसतो.म्हणूनच कि काय जेव्हा आपण वास्तू पुरुषाची प्रतिमा पाहतो तेव्हा ती संपूर्ण चौकोनातच असते म्हणजेच आपल्या पूर्वजांना आपल्याला या प्रतिमेतून ते सांगू इच्छितात कि आपले राहते घर हे चौकोनातच असावे कुठेही याचा भाग वाढलेला नसावा,कापलेला नसावा .

4. चौथी गोष्ट पूर्वी घराचे बांधकाम करताना ज्या भौगोलिक परिस्थितीत घर बांधले जातंय त्या विभागामध्ये आढळणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर तेथील घरांमध्ये केला जायचा उदा.लाकूड,चिऱ्याचे दगड,मातीच्या विटा,काळे  जांभे दगड आणि माती कारण या गोष्टी तेथील भौगोलिक तापमानाला साजेशा आहेत, उपलब्ध आहेत आणि त्या तापमानाला समतोल ठेवणारे असतात याच विरुद्ध आता जे बांधकाम करतोय त्यामध्ये या गोष्टींचा आपण कितीसा वापर करतोय? बहुदा यामुळे देखील वास्तूतील समतोलपणा बिघडण्याचे एक करणं असू शकते.              5.पाचवी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट ती म्हणजे वास्तूंमध्ये निर्माण केलेल्या अग्नीचे स्थान पूर्वीच्या बांधकाम मध्ये अग्नीचे स्थान हे अग्नेय दिशेला दिले जायचे कारण त्यामागे शास्त्रीय कारण दडलेलं आहे.हेच जर अग्नीचे स्थान अग्नेय दिशा सोडून दुसऱ्या दिशेस असेल तर वास्तूतील समतोल पण बिघडून मानवी शरीराला घातक ठरते आणि आताच्या बांधकामधे तसेच काहीसे चित्र आपल्याला दिसत आहे.आपल्या सोयीनुसार माणसे घरातील स्वयंपाक घर हे कधी नैऋत्य दिशेत,वायव्य दिशेत,पश्चिमेच्या मध्याला, दक्षिणेच्या मध्य दिशेला,उत्तरेच्या मध्य दिशेला,ईशान्य दिशेत किंवा पूर्व मध्य दिशेत पण दिसून येते जे शास्त्रा नुसार योग्य नाहीत आणि त्याचे भयानक परिणाम त्या वास्तूंमध्ये दिसून येतात.                        ह्या पाच गोष्टी प्रामुख्याने शास्त्र लिहिताना पाळल्या गेल्या जेणेकरून मानवी जीवनाला शारीरिक ,मानसिक आणि आर्थिक स्थेर्य लाभेल.त्या कुटुंबाला त्या वास्तूमधे सुख लाभेल म्हणूनच वास्तुशास्त्राची निर्मिती करण्यात आली .

Leave a Comment