वास्तुदोष  म्हणजे काय ?

           या शब्दाचा अर्थ जर आपण जाणून घेतला तर वास्तू + दोष म्हणजेच वास्तूतील कमतरता किंवा त्यातील चुका.  ज्या वास्तूमध्ये येणाऱ्या समतोल नैसर्गिक उर्जेला रोकतात किंवा त्यात बाधा आणतात.या प्रक्रियेमुळे वास्तूतील समतोल पणा बिघडतो ,आपल्या रोजच्या जीवनशैलीतील समतोल पणा बिघडू शकतो म्हणजेच ज्या गोष्टी सुरळीत झाल्या पाहिजेत त्या तशा होत नाहीत काहीं न काही अडकाठ्या कामं मध्ये येत राहणे ,शुभ कार्यात बाधा येणे ,अकस्मित काही वाईट, दुःखद घटना घडणे,थोडक्यात घरामध्ये शारीरिक ,मानसिक,आर्थिक आणि वैवाहिक समस्या तयार होऊन घरामध्ये क्लेश निर्माण होणे ,घरातील आनंद आणि सौख्य कमी होणे अशा घटना या वास्तुदोषांमुळे घडू शकतात.                                                                   अशा घटना आपल्या घरात घडत असतील तर आपल्या वास्तूत काहीतरी असमतोल झाले असेल. हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या वास्तू कडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. सध्य स्तिथीला बऱ्याच लोकांना अजूनही वास्तुशास्त्राचा अर्थ काही वेगळाच वाटतो म्हणजे बऱ्याचदा हा फ्रिज, देवारा कुठे लावावा,माक्रोवेव्ह कुठे ठेवावं ,झोपताना बेडची दिशा कोणती असावी,तिजोरी कुठे ठेवावी,भिंतीवरचे घड्याळ कुठे लावावे,काहींना तर अग्नेय दिशेत घराचे किचन आले,पूर्व दिशेत किंवा उत्तर दिशेत दरवाजा आला कि झाले वास्तुशास्त्र असे काहीसे वाटू लागले आहे . मुळात हे वास्तुशास्त्र आहे कि वस्तुशास्त्र हेच कळेनासे झाले आहे . हे वास्तूचे शास्त्र आहे म्हणजेच वास्तूचा आकार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा पाळला गेला पाहिजे जर तो आकार चौकोनात नसेल तर त्या वास्तूंमध्ये समतोलपणा राहणारच नाही. त्यानंतर इतर काही मुद्दे चालू होतात जसे शौचालाय,स्नानगृह ,स्वयंपाकघर योग्य दिशेत किंवा योग्य चरणात आहेत कि नाहीत . त्यांनतर मुख्य दरवाजा कोणत्या दिशेत आणि कोणत्या चरणात आहेत हे पहिले जातात.                                                                        पूर्वी राहत्या वास्तूला किंवा घराला खूप महत्व दिले जायचे अगदी पायाभरणी पासून घर भरणी पर्यंत कटाक्षाने लक्ष दिले जायचे आपल्या  घरात बांधकामामध्ये कुठे चूक तर होत नाहीये ना या कडे बारकाईने लक्ष दिले जायचे कारण राहते घर आपल्या आयुष्यात फार महत्वाचे काम करत आपली व आपल्या कुटुंबाची पुढची वाटचाल हि आपल्या राहत्या घरवरच अवलंबून असते म्हणूनच बहुदा आपल्या पूर्वजांनी काही म्हणी लिहून ठेवल्या आहेत,जसे ”घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून “,”घर घर लावते ”,”घर फिरले कि घराचे वासे हि फिरतात” या म्हणीन पासून बराच गहण आणि महत्वाचा संदेश आपले पूर्वज आपल्याला देऊ इच्छितात. म्हणूनच कि काय पूर्वी मुलीचे लग्न ठरण्या अगोदर मुलीकडचे काही जाणकार माणसे ज्या मुळाशी लग्न होणार आहे त्या मुलाचे पहिले घर पहिले जात असे ,त्या घरत आपली मुलगी सुखी राहू शकते कि नाही, ते शास्त्र नुसार बांधले गेलेले आहे कि नाही हे पाहिले जायचे.                                                                     सध्य स्तिथीला आपण ज्या घरांमध्ये राहतोय ती घरे वास्तुशास्त्राच्या कुठल्याच नियमात बसत नाहीयेत मुळात आपण जी घर बांधणीची पद्धत अवलंबली आहे ती पाश्चत्य संस्कृतीची आहे म्हणूनच त्यांना अपार्टमेंट्स,बंगलो ,रो-हाऊस,अशी पाश्चत्य नावांनी ओळखली जातात.जी घरे आपल्या वातावरणाला अनुकूल नाहीत त्या घरांमध्ये वास्तुदोष असणारच.अशा स्तिथी मध्ये असं एकही घर मिळणं मुश्किल झालाय कि ज्या घरत एकही वास्तुदोष नाही आणि ज्या घरात एकही त्रास नाही.  

Leave a Comment