घरांचा आकार चौकोनी किंवा आयताकृती का असावा ?

          आपण जर भारतीय हवामानानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार जर बारकाईने विचार केला तर सर्व प्रथम आपण समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये राहतो याचा अर्थ काय ? तर भारता मध्ये तीनही ऋतुमान सम प्रमाणात आढळतात. चार महिने पावसाळा,चार महिने हिवाळा आणि चार महिने उन्हाळा याचा अर्थ हे तिन्ही ऋतू सम प्रमाणात आपल्या वास्तूवर आणि आपल्या शरीरावर परिणाम करत असतात म्हणूनच बहुदा आपल्या पूर्वजांनी आपल्या ऋतुमानानुसार आपला आहार देखील निश्चित केला आहे . तो सम प्रमाणात राहावा आपल्या शरीराला पोषक आहार मिळावा म्हणून आपले सण देखील त्याच पद्धतीने त्या ऋतूला साजेसा आहार घेऊन साजरे करतो मग अशा स्तिथीत आपल्या वास्तूला पण या तीनही ऋतूंचा सम प्रमाणात मारा होऊन ती समतोल रहावी. या पृथ्वी वरील पंचमहाभूतांचा (जल,वायू ,अग्नी ,आकाश आणि जमीन ) समतोल राहावा. हा समतोलपणा चौकोन किंवा आयत हाच आकार सांभाळू शकतो.                                                            तसेच पृथ्वी वर होणारा गुरुत्वाकर्षणाचा मारा हा पृथ्वीच्या उत्तर अक्षांशा पासून दक्षिण अक्षांशाकडे होत असतो आता पृथ्वीचा उत्तर अक्षांश हा २३ अंशाने कललेला आहे. म्हणजेच हा  गुरुत्वाकर्षणाचा मारा आपल्या वास्तूवर आणि आपल्या शरीरावर ईशान्य दिशेकडून नैऋत्य दिशेकडे होत असतो . हा होणारा  मारा देखील आपल्या वास्तूवर समतोल राहावा म्हणून भारतामधली घरे ही चौकोनात किंवा आयताकृती आकारातच बांधली जात होती .                                      तसे जर नसते तर आपणही आपली घरे इग्लू सारखी गोलाकार ,तंबूंची घरे  किंवा झाडावरची घरे बांधली असती अशा घरांमध्ये आपण का बरे राहत नाही ?कारण या प्रकारची घरे आपल्या वातावरणाला पोषक नाही आहेत.                                 सध्य स्तिथीला आपण ज्या घरांमध्ये राहत आहोत त्याचे आकार आपण कधी बारकाईने पहिले का ?

         वरील आकृत्यांमध्ये विविध घरांचे  आकार आपल्याला पाहायला मिळतात.या आकारांमध्ये चौकोन किंवा आयत कुठेच सापडत नाही कुठलातरी भाग कापला गेलेला आहे. कुठलातरी  भाग वाढलेला आहे आपल्या सोयीनुसार किंवा उपलब्ध जागे नुसार नको त्याजागी  किचन आलेला आहे, दरवाजा आलेला आहे मग अशा घरांमध्ये शारीरिक ,मानसिक आणि आर्थिक सुख त्या कुटुंबाला कसे  लाभेल ? जेव्हा घरातील कोणताही भाग कापला जातो किंवा वाढतो तेव्हा घरात येणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण असंतुलित होऊन त्याचा प्रभाव घरचा दुसऱ्या भागावर देखील होतो. उदा . जर  अग्नेय दिशेतील कोपरा कापला गेला असेल तर साहजिकच त्याचा भार नैऋत्य किंवा ईशान्य दिशेवर पडतो अशा घरांमध्ये अग्नेय आणि नैऋत्य दिशेतील दोन्ही परिणाम त्या कुटुंबाला सोसावे लागतात. म्हणूनच भारतीय हवामानात किंवा भौगोलिक परिस्थिती आपली वास्तू चौकोनात किंवा आयाताकृती आकारात असावी.                                जर आपण जागतिक दृष्ट्या विचार केला तर प्रत्येक देशामध्ये तेथील हवामान ,ऋतुमान आणि तापमान यांचा विचार करूनच घराची बांधणी केलेली आपल्याला आढळते. मग आपण आपल्या हवामानानुसार घरे  बांधली पाहिजेत की आपण परकीय लोकांसारखी घरे बांधली पाहिजेत ?

Leave a Comment