वास्तूतील दिशा आणि त्यांचे परिणाम

ईशान्य दिशेत शौचालय/बाथरूम/कट असेल /स्वयंपाक घर असेल / इमारतीचा पिलर असेल/ घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

Ishanya Disha vastu doctor

                     जर हा कोपरा व्यवस्थित असेल तर आर्थिक स्थिती  चांगली राहते. तसेच सामाजिक स्थान सुद्धा चांगले राहते . नोकरीमध्ये बढती होते . मुलांची अभ्यासात चांगली प्रगती होते . ही दिशा परमेश्वराची आहे. हे स्थान लक्ष्मीचे आहे. पण जर या कोपऱ्यात कोणताही वास्तुदोष असेल, तर आपल्या आयुष्यात खूप समस्या येऊ शकतात . ईशान्य कोपऱ्याला वास्तुच नाक असे म्हणतात . वास्तू या कोपऱ्यातून  श्वासोच्छ्वास करत असते . तसेच हि पाण्याची सुद्धा दिशा आहे . इथे गुरु शक्तिशाली असतो. घरमालकाच्या आयुष्यात अमानुष अडचणी येऊ शकतात जर घरमालकाचा व्यवसाय असेल, तर त्याला व्यावसाय सुरु करण्यात तसेच त्यात स्थैर्य मिळवण्यात खुप अडथळे निर्माण होऊ शकतात, तसेच त्यांना कायम आर्थिक अडचणींना देखील सामोरे जावे लागू शकते,  व्यवसाय डबगायीला येणे,चालेनासा होणे ,कर्ज वाढणे ,उधारी वाढणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. ह्या दिशेला शौचालय असेल , तर परमेश्वराची अवकृपा होऊ शकते.घरमालकाची आर्थिक हानी होणे  ,व्यवसाय अधोगतीला लागणे, घरात एकमत नसणे . व्यावहारिक बुद्धिमत्तेवर झापड येऊ शकते त्यामुळे भावाने मध्ये वाहून  लोकांना आर्थिक मदत करणे ते पैसे परत न आल्यामुळे कर्ज वाढणे ,इतर लोकांकडून यांचा वापर करून घेणे ,कामामध्ये बढती न होणे.समाजामध्ये अपमानास्पद घटना घडू शकतात.                                     मुलांचे अभ्यासात लक्ष लागे नासे होऊ शकते.त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात ते मागे पडू शकतात , त्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात. हा कोपरा पाण्याशी निगडीत असल्यामुळे ,पाण्यामुळे होणारे रोग निर्माण होऊ शकतात . उदा. कॉलरा, पाटकी,कावीळ, त्वचारोग, आमांश, डोळ्यांचे आजार व लहान मुलांची आजारपणे, हृदय संदर्भात असणारे विकार हार्ट अटॅक ,हार्ट ब्लॉक, चामडीचे रोग होऊ शकतात (सोरायसिस ,चेहऱ्यावरील किंवा अंगावरील डाग ) तसेच डोळ्यांचे विकार घरातील कुठल्याही सदस्याला होऊ शकतात. संततीची प्रगती मध्ये अडथळे येऊ शकतात ,संततीला जन्मजात शारीरिक व्यंग किंवा आजार होऊ शकतात  . जननेंद्रियांच्या विकार ,त्वचेचे विकार ,जवळच्या नातेवाईकांचा त्रास, विसरभोळेपणा ,उजव्या डोळ्यांचे विकार , मासिक पाळी ,इत्यादी त्रास होऊ शकतात. अशावेळी ईशान्य दिशेला दुसरा शौचालय ,किचन असेल तर रक्त्तदाब वाढण्याची शकता असते .आर्थिक चिंता वाढते, मुलांमध्ये मती मंदता येण्याची शक्यता असते,आतड्यांचे  विकार  होण्याची शक्यता असते. 

उत्तर मध्य दिशेत शौचालय/बाथरूम/कट असेल /स्वयंपाक घर असेल / इमारतीचा पिलर असेल / घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

uttar disha

        उत्तर ही बुधाची  दिशा आहे. जर स्त्रीचे तोंड स्वयंपाक करताना उत्तररेकडे असेल ,तर ती बुधाने  प्रभावित असते .या स्त्रिया हुशार ,चाणाक्ष ,चांगली स्मरणशक्ती असलेल्या असतात.ज्यामुळे त्यांना सर्व चांगल्या व  वाईट गोष्टी स्मरणात राहतात. ज्या भांडणाचे कारण बनतात .हि स्त्री छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडते .घरात अन्नाचा अपव्यय होतो . या घरात खूप पाहुणे,नको असलेले पाहुणे येतात.कमवलेले  पैसे सहज खर्च होतात.पैश्याचा वापरावर नियंत्रण नसते.ज्यामुळे घरात सतत चिंता असते .ह्या दिशेला शौचालय असेल तर आर्थिक बाबतीत त्रास संभवतो, उत्तर दिशा कुबेराची  दिशा समजली जाते.त्यामुळे उत्तर दिशेला शौचालय असेल , तर आर्थिक बाबतीत फार चढउतार होऊ शकतात .                            जर उत्तर दिशेला कापलेला भाग असेल . तर त्या घरातील लोकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते पैसे कमावणे खूप कठिण होऊ शकते. मेंदूशी निगडीत आजार होऊ शकतात . उदा .अर्धांगवायू ,अर्धशिशी डोकेदुखी , मेंदूचा ट्युमर , मेंदूचा स्ट्रोक होण्याची शक्यता असते .घरातील व्यक्तीचे कर्ज वाढू शकते . घरातील व्यक्तीना आयुष्यात येणाऱ्या समस्यांवर उपाय शोधणे कठीण होऊन बसते, पचन इंद्रिय लहान आतडे , मानसिक विकृती ,पाळीत दोष ,स्तनांचे विकार ,पाठीचे दुखणे ,यांचा त्रास संभवतो,त्यामुळे घरात मेंदूशी निगडित आजार जडतात. घरात असलेला सगळा पैसे आजारपणात जाऊ शकतो .

वायव्य दिशेत स्वयंपाकघर/ शौचालय/बाथरूम/कट असेल /वाढलेला असेल/इमारतीचा पिलर असेल / घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

vayavya disha

         या दिशेत वास्तूतील कोणताही दोष असेल तर त्याचा मानसिक स्थिरतेवर परिणाम होतो. . मानसिक ताणतणावास सुरवात होऊ शकते  आणि तणावामुळे आत्मघातकी प्रवृत्ती वाढू शकते . अस्ताव्यस्तता निर्माण होऊ शकते . वायूशी निगडित आजारपण निर्माण होऊ शकतात  उदा . असिडिटी ,अजीर्णता,अति उत्साहितपणा(anxiety) प्रवासात समस्या निर्माण होऊ शकतात  .पाठीच्या कण्याच्या समस्या उध्दवू शकतात,घरामध्ये झोपेचे विकार वाढू शकतात ,मानसिक विकार होऊ शकतात, घरातील एकात्मकता आणि एकजूट पण  कमी होऊ शकते . निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.                                                  ह्या दिशेला शौचालय बहुसंख्य वास्तुशास्त्रज्ञानी मान्य केला आहे . परंतु ही दिशा चंद्रग्रहाची आहे . इथे मनाची चंचलता वाढते . ह्या दिशेला शौचालय असेल . तर तरुण स्त्रिया पुरुषांची मने चंचल बनू शकतात . एकमेकाला समजून घेण्याची वृत्ती कमी होऊ शकते  . माझेच खरे असे प्रत्येकाला वाटू लागू शकत . शेजाऱ्यांशी भांडणे होण्याची शक्यता आहे . मने कठीण होऊ शकतात . सार्वजनिक कामात मनापासून भाग घेइनास होऊ शकतो. आपले चुकत नाही असे वाटते .                    कुठलीही वस्तू जी या ठिकाणी ठेवली ती पटकन वापरली जाते . त्यामुळे त्या गोष्टीची गरजही जास्त असते . आणि वापरही जास्त असतो . या स्वयंपाकघरामध्ये दुर्घटना घडू शकतात . या घरातील पुरुष हट्टी आणि कुणाचेही न ऐकणारे असतात . एखादी छोटीशी घटना मोठ्या भांडणाचे कारण बनू शकते . या घरात पोटाचे आजार ,रक्त्तदाब ,मानसिक समस्या ,उध्दवू शकतात . सासू सुनेमध्ये भांडणे होऊ शकतात . प्रेम प्रकरणांना यश मिळत नाही  . मुलांची मानसिक वाढ खुंटते . या घरातील लोकांना समस्या आयुष्यभर भेडसावत असतात . कारण या घरात प्रगती होत नाही . पैश्यांच्या दुरुपयोग होतो . गैरसमजुती  असतात.  आणि चुकीचे ,अयोग्य व्यवहार केले जातात.अशा घरांमध्ये लोक भावनाविवश होऊन कुठलीही टोकाची भूमिका घेऊ शकतात .

पश्चिम मध्य दिशेत कट असेल/भाग वाढलेला असेल /स्वयंपाक घर असेल / इमारतीचा पिलर असेल. घराच्या बाहेरून जिना असेल.

Pachim disha

             जर पश्चिम मध्यावर कापलेला भाग असेल,या दिशेवर शनी ग्रहाचे वर्चस्व असते त्यामुळे कोणतेही काम सहज व सरळ होते नाही तोंडाशी आलेले  घास दूरवर जाऊ शकतात , घरातील स्त्रियांचा वर्चस्व व संख्या वाढण्याची शक्यता असते .सुरवातीला अशा घरामधे फार छान छान वाटते तसेच सुरवातीला अशा घरांमध्ये हत्ती सारखा पैसा येतो परंतु काही काळानंतर या घरात पैसे येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते व त्यानंतर पैसे येणायचे बंद होऊ शकते .  घरात पैसा टिकत नाही . कामे रखडतात लोकांना असे काही आजार होतात ज्याने ते पूर्णपणे अंथरुणाला खिळून राहणारे आजार होऊ शकतात.  घरमालकाला  घराचा सहवास खूप कमी लाभू शकतो. दूरवर बदल्या होणे घरमालक कामास्तव भटकंती वर राहणे असे प्रकार पण होऊ शकतात.                                                 पश्चिम तोंड करून स्वयंपाक करणाऱ्या महिलेला थायरॉइड किंवा घश्याचे विकार होऊ शकतात या स्त्रिया अस्वस्थ असतात तसेच तसेच चिडखोर असतात. खूप मोठ्या मोठयाने बोलतात व भांडणे करतात. शिजवलेल्या अन्नाची चव हळूहळू बेचव होऊ शकते तसेच अन्न वाया जाणे असे प्रकारही  होऊ शकतात   स्त्रिया नाखुशीने स्वयंपाक करू शकतात . कुठलेही काम वेळेवर होत नाही .प्रत्येक गोष्टीत उशीर होतो .

नैऋत्य दिशेत स्वयंपाकघर/ शौचालय/बाथरूम/कट असेल /वाढलेला असेल/इमारतीचा पिलर असेल / घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

nairutya disha

          हि दिशा घरमालकाची त्यामुळे या दिशेत कोणताही वास्तूदोष असेल  ,तर कुटूंब प्रमुखाचे आरोग्य बिघडू शकते,अकाली अपघाती मृत्यू होऊ शकतो ,घरमालकावर जीवघेणा हल्ला होऊ शकतो  घरावर अमानवी संकटे येत असतात . वाईट आजार संभवतात, लवकर बरे न होणारे आजार संभवतात .घरात पुरुषांना कमरेखाल च्या व्याधी होऊ शकतात जसे मुतखडा,मूळव्याध ,किडनीचे विकार , लघवीचे विकार ,मांड्यांचे विकार ,यकृत संबंधित आजार इ .गोष्टीचा त्रास  होऊ शकतो ,पायांचे आजार होऊ शकतात. घरात एकसंघता राहत नाही अविश्वास निर्माण होण्याची शक्यता असते . केलेली गुंतवणूक बुडण्याची शक्यता असते,आर्थिक फसवणूक होऊ शकते , अस्थिरता निर्माण होते . अपघात, भांडणे, कोर्टकचेऱ्या,पोलीस स्टेशन  या संबधीत त्रास संभवू शकतो.                                                   लाल रंगाच्या वस्तू ,कठीण पदार्थ मिठाई ,रसदार पदार्थ , तिखट पदार्थ , तंबाखू ,शस्त्र बनवणारे कारखाने , शैक्षणिक संस्था , शेतीची अवजारे ,सुगंधित द्रव्ये , काळ्या वस्तू ,मध, जनावरे ट्रान्सपोर्ट  इत्यादी . धंद्यात प्रगती होत नाही . अडथळे निर्माण होतात .प्रमुख पुरुषाला यश मिळत नाही . घरात नेहमी ताण-तणावाचे  वातावरण ,पैशाची आवक कमी राहते .या दिशेत कुठलाही वास्तू दोष असेल तर घरमालकाचे  वर्चस्व हळूहळू नष्ट होऊ शकते,घरात आणि समाजात त्याचे स्थान खालच्या पातळीला जाऊ शकते.                                                    हा पृथ्वी तत्वाचा कोपरा आहे. या कोपऱ्याला राहू आणि केतुचे नियम लागू होतात. जर हा कोपरा वाढलेला असेल किंवा कापलेला असेल तर घरात  अस्थिरता निर्माण होते . हा कोपरा शरीराच्या कमरेखालच्या भागाचे निवेदन करतो.  हा कोपरा उत्तर ध्रुवाला ओलांडतो. तसेच हा कोपरा गुरुत्वकर्षण आपल्या जवळ ओढतो . इथे अनैसर्गिक शक्ती तयार होतात.अशा वास्तूंमधे भयग्रस्त स्वप्न पडणे किंवा भास होणे, भयग्रस्त आवाज होणे असे प्रकार होऊ शकतात आणि त्यांचा वास्तूवर परिणाम होतो. घरात राहणाऱ्या लोकांचे मानसिक स्थेर्य  बिघडते. लोकांमध्ये नकारात्मक व गुन्हेगारी प्रवृत्ती निर्माण होऊ शकते. घरात होणाऱ्या वादांचे प्रमाण वाढू शकते. लोक कोर्टकचेऱ्यात, कायद्याच्यात समस्यांमध्ये विनाकारण गोवले जाऊ शकतात. तसेच कमरेखालील आजारपणात वाढ होऊ शकते . लोकांना मुत्राच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.                                               जर पश्चिमेला तोंड करून स्वयंपाक करण्यात येत असेल . तर अन्न बेचव होते ,आणि स्वयंपाक करण्याऱ्याला त्यामध्ये काहीही रस नसतो . या घरातील  लोक जेवायला खूप वेळ लावतात . अन्न वाया जाते . मालकाला समस्या असतात . चोरी होण्याची शक्यता असते . अनैसगिर्क समस्यांना तोंड द्यावे लागते .

दक्षिण मध्य दिशेत कट असेल/भाग वाढलेला असेल /स्वयंपाक घर असेल / इमारतीचा पिलर असेल/ घराच्या बाहेरून जिना असेल.

dakshin disha

           जर  दक्षिणेच्या मध्यावर कापलेला भाग असेल, तर नैऋत्य आणि आग्नेय दिशेतील कापलेल्या भागांचे दोष सुद्धा दिसून येतात . या दिशेला मंगळ ग्रहाचे वास्तव्य असते . आणि त्यांचा वर्चस्वामुळे शस्त्रक्रिया  तसेच अपघात होण्याची शक्यता असते मंगळ हा उष्णतेचा ग्रह आहे . आणि त्या मुळे उष्णतेत वाढ होते .                                                दक्षिण दिशेचा मंगळ हा कारक आहे . या घरामध्ये खूप भांडणे होतात . जर घरातील स्त्रिया दक्षिणेकडे तोंड करून स्वयंपाक करत असेल . तर तिला पूर्वीच्या गोष्टी सतत आठवत असतात . तर त्यामुळे घरात सतत भांडणे व वादावाद होत असतात . या घरामध्ये दीर्घकाळाचे आजार  होतात . कुठली ना कुठली व्यसने असतात . दीर्घकाळाचे आजार होतात . अचानक मृत्यू होऊ शकतो . या घरात कर्ज वाढतात , सांध्यांची दुखणी असतात .(ऑपरेशन )  सर्जरी होण्याची शक्यता असते .  घरात खर्च वाढू शकतात त्यामुळे येणारी आवक कमी पडू शकते .खरेदीला गेल्यावर अनावश्यक वस्तू खरेदी करून नंतर त्यावर मनस्थाप  होऊ शकतो.

अग्नेय दिशेत शौचालय/बाथरूम/कट असेल /वाढलेला असेल/इमारतीचा पिलर असेल /बोरवेल किंवा विहीर असेल/ घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

nairutya disha

        ही शुक्र ग्रहाची दिशा.तरुणाईची ,सौंदर्याची दिशा ,भौतिक सुखाची दिशा ,ह्या दिशेस शौचालय असेल तर तरुण मुले , मुली स्त्रिया यांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.तरुण नको तिथे प्रेमात पडण्याची शक्यता असते, नंतर पश्चाताप होऊ शकतो . बुद्धीला झापड येऊ शकते, विवाहबाह्य संबंध वाढू शकतात ,घरात तापटपणा  वाढू शकतो , पुरुषांना व्यसनांचे प्रमाण वाढू शकते, सारासार विचार शक्ती शारीरिक सुखाच्या ओढीने कमी किंवा वाढू शकते. घरातील तरुण मुली मुलांवर बाहेरच्या व्यक्तीच्या छाप पडू शकते व  त्यांचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो .                                        अग्नेय दिशेला शौचालय असेल तर तळपायांचे विकार, श्वसना संबंधित त्रास, श्रम सहनशीलता कमी होऊ शकते. पाण्यापासून बनणारे पदार्थ ,कपडे , मासे ,मत्स्य व्यवसाय,तेल ,रंग ,विषारी औषधांचे कारखाने ,शैक्षणिक संस्था ,सर्व तऱ्हेची अत्तरे , पिवळ्या रंगाचे पदार्थ , घोडा कापूर , लोखंडाचे व्यापारात नुकसान होऊ शकतो .  घरात स्त्रीयांची आजारपणे सुरु होऊ शकतात  . स्रियांना कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यांच्यावर वाईट प्रभाव पडू शकतो . लग्न न जमणे, उशिरा लग्न होणे , लग्न मोडणे, गर्भधारणे संबंधी समस्या, मुल न होणे असे काही प्रकार घडण्याची शक्यता असते, तसेच घरातील जोडप्यांमध्ये सतत भांडणे होऊ शकतात . या कोपऱ्यात शुक्र ग्रहाचे वास्तव्य असते. वाईट विचार मनात येऊ शकतात, घटस्फोट होण्याची शक्यता असते. व स्त्रियांचे शारिरीक स्वास्थ बिघडू शकते . पतिपत्नी मध्ये कलह निर्माण होऊ शकतात . तसेच त्यांचे नातेसंबध बिघडू शकतात. त्यांना शुक्राशी निगडीत असे रोग होऊ शकतात. घरात किंवा इमारतीत आग लागण्याची शक्यता असते,भाजण्याचे प्रकार होऊ शकतात , मुले वाईट मार्गाला लागू शकतात. उष्णतेच्या निगडीत असणारे रोग होण्याची शक्यता असते. उदा. त्वचारोग,पोटाचा अल्सर,ताप येणे.

पूर्व मध्य दिशेत स्वयंपाकघर/ शौचालय/बाथरूम/कट असेल /वाढलेला असेल/इमारतीचा पिलर असेल / घराच्या आतून किंवा बाहेरून जिना असेल.

purva disha

        या घरात यश मिळवण्याकरिता बराच काळ लागू शकतो ,या घरात राहण्याऱ्या व्यक्तीमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना कमी होऊ शकते . या घरातील स्त्रीया भांडखोर व वादावादी करणाऱ्या असू शकतात . सामाजिक प्रतिष्ठा कमी होऊ शकते . समाजात मानसन्मान मिळेनासे  होऊ शकते . नोकरीत प्रमोशन रखडले जाऊ शकते                         मालकाच्या आरोग्याच्या तक्रारी असतात . घरातील माणसांना शारीरिक दुखणे ,ब्लड प्रेशर ,मधुमेहाचा त्रास,रक्ताभिसरणाचे रोग होऊ शकतात. घरातील प्रमुख पुरुषाला शारीरिक त्रास संभवतो . मेंदूचे विकार  डोकेदुखी ,उष्णप्रक्रुती संभवते ,कुठलीही गोष्ट मिळवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागू शकतात . मूळव्याध , रक्तदाब, उष्णतेचे विकार होऊ शकतात . कापणे, जळणे ,भाजणे, शस्त्राघात होऊ शकतो .या  घरात मालकाच्या इज्जतीला धोका निर्माण होऊ शकतो . या घरात यश मिळण्यासाठी बराच काळ जावा लागतो . या घरात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना कमी असते . या घरातील स्त्रिया भांडखोर व वादावादी करणाऱ्या असतात . मालकाच्या आरोग्याच्या तक्रारी असतात . घरातील माणसांना शारीरिक दुखणे ,ब्लड प्रेशर ,मधुमेहाचा त्रास असतो . 

Leave a Comment